समावेशित शिक्षणामुळे धनश्रीला मिळाली आर्थिक मदत


                                          महानगरपालिका शाळा क्र. ८७ मखमालाबाद गाव येथे इयत्ता दुसरीला शिकणारी कु. धनश्री वाघ ही दिव्यांग आहे व तिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे हे समजल्यावर *मनपा शिक्षण विभाग व प्रादेशिक विद्याप्राधिकरण, नाशिक येथे कार्यरत समावेशित शिक्षण तज्ञ श्री. प्रल्हाद हंकारे* यांनी तिच्याघरी भेट देवून दिव्यांग असल्याचे कागदपत्रे घेवून *बी.आर.शेठ आणि बाई पुतलीबाई चॅरिटी ट्रस्ट, मुंबई* संस्थेकडे सादर केली असता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही दिवसातच या ट्रस्ट मार्फत तिला धनादेशाद्वारे आर्थिक मदत मिळवून दिली. त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व पालक यांनी श्री. प्रल्हाद हंकारे व बी.आर.शेठ आणि बाई पुतलीबाई चॅरिटी ट्रस्ट, मुंबई यांचे आभार मानले. *या प्रसंगी उपस्थित मुख्याध्यापिका सौ. नंदिनी ठाकरे व सर्व शिक्षक तसेच पालक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: